
गोंदिया,दि.24ः महाराष्ट्र -छत्तीसगड पोलीसांच्यावतीने आज 24 नोव्हेंबरला राबविण्यात आलेल्या सयुंक्त नक्षल सर्च मोहिमेंतर्गंत नक्षल्यानी पेरुन ठेवलेले स्पोटक साहित्य मिळाल्याने मोठी घटना उघडकीस आली आहे.छत्तीसगड राज्यातील कोहाबहारा गावांतर्गत घोडापाठ जंगलात हे साहित्य आढळून आले.छत्तीसड राज्यातील दुर्गचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा, गोंदिया पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, राजनांदगांव पोलीस अधीक्षक डी. श्रवन,उपविभागीय पोलीस अधिकारी खैरागढ़ जी.सी पति यांच्या मार्गदर्शनात ही सर्चिंग मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेहत गोंदियाचे सहायक उप निरीक्षक राजेंद्र भंडारकर,मनोज मेंढे,बोर तलाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अब्दुल समीर,गातापारचे उपनिरीक्षक जितेंद्र डेहरियाच्या संयुक्त टीमने छत्तीसगढ़च्या गातापार कैंप मलेदा अंतर्गत घोड़ापाठ जंगलात सर्चिंग करीता जात असतानाच एक प्लास्टिकचा ड्रम आढळून आल्याने सावध होत पाहणी केली.दरम्यान त्या ड्रममध्येर 1 भरमार बंदूक बैरल, 1 नग एचपी ग्रेनेड आउटर कवर, इलेक्ट्रिक वायर 5 बंडल, 1 नग सोलर प्लेट, 23 नग बैटरी, 24 टार्च, स्विच, सेलोटेप, चाकू,कनवर्टर बॉक्स नक्षल्यानी लपवून ठेवल्याचे उघडकीस आले.सदर साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.





