
अर्जुनी मोरगाव,दि.26:गावागावात कलावंताचा जन्म होतो, आपली कला सादर करुन जीवन जगण्यासाठी उदरनिर्वाह करतात. पन्नास वर्ष वय झाले की शासनाकडून वृद्ध कलावंत मानधन योजना प्रत्येक कलाकारांला मिळते. पण गेल्या काही महिन्यांपासून समाज कल्याण जिल्हा परिषदमध्ये समितीच गठित नाही, म्हणून वृद्ध कलाकार मानधन समिती गठित करा अशी मागणी कलावंतानी केली आहेत.
आपली माती म्हणजे हौसी कलाकार जन्मास घालणे व एक मोठे नाव उज्ज्वल करणे फार महत्वाचे आहे.परिसरासह झाडीपट्टीचा भाग म्हणजे पुर्व विदर्भातील गोंदिया जिल्हा नाटक,तमाशा, कवी, साहित्यिक, गोंधळ, भजन, डहाका किर्तन, दंडार आदीचे कलाकार व सहभागी वादक मंडळी साहित्याची व कलेची सेवा करतात.पन्नास वर्ष पूर्ण झाले की अशा कलाकारांना शासन दरबारी वृद्ध कलावंत मानधन योजने अंतर्गत मानधन सेवा योजना लागू होते.पण गोदिंया जिल्ह्य़ात ही योजना काही महिन्यांपासून ठप्प दिसते आहे.
अनेक कलाकार मंडळी मानधनापासून वंचित आहेत.काहींचे प्रस्ताव सादर केले त्यांना अजूनही योजना लागू झाली नाही. मागील समितीकडून कलावंताचे प्रस्ताव उत्तमरित्या शासनाकडे सादर झाले नाही तर आता जवळपास एक वर्षांपासून ही समिती स्थापन करण्यात आली नाही.
कोरोनाच्या संकटामुळे शहराच्या कलाकाराप्रमाणेच ग्रामीण भागातील कलावंत उपेक्षितच आहेत, कोरोना वाढू नये म्हणून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत, अशातच कलावंतावर उपासमारीची वेळ आहे, म्हणून ही तरी समिती गठित करुन वृद्ध कलावंताना मानधना लागू करुन चेहरा हसतमुख फुलवावा असी मागणी सर्व कलाकार मागणी करीत आहेत.
मी वृद्ध कलावंतासाठी लढतो आहे, त्यांना मानधन लागू व्हायला हवे, समीतीवर होतकरु व काम करणा-या लोकांची निवड करावी.
– मुन्नाभाई नंदागवळी,
कवी-कलावंत व साहित्यिक
——————
समिती गठित करुन, समितीने लवकर राज्य शासनाचा मानधन लागू करावा.
– के. ए. रंगारी, कलावंत नवेगावबांध





