
गोंदिया,दि.30ः-गोंदिया-तिरोडा राज्यमार्गावरील भागवतटोला गावाजवळील वळणरस्त्यावर आज 30 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजेच्या सुमारास झालेल्या एका अपघातात तिरोडा तालुक्यातील खैरबोडी येथील 2 युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.घटनास्थळावरील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर युवक हे मोटारसायकलने येत असताना एका भरधाव ट्रकने धडक दिली.यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.त्यामध्ये रवीन्द्र ईळपाते व रणवीर मरस्काेले यांचा समावेश आहे.





