
भंडारा दि.02: ग्रामपंचायत उसगांव, चांदोरी, पळसपाणी, घानोड, आमगांव बु., उमरझरी , खैरी (वल.) बोरगांव, परसटोला, खांबा, मोखे, विर्सी, उकारा, चारगांव, बाम्हणी, धर्मापुरी, शिवनीबांध, साखरा, कटंगधरा व बोळदे येथील सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, साकोली तालुक्यातील माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता संगणक प्रणालीतून निवडणूकीव्दारे भरण्यात यावयाच्या ग्रा.पं. च्या सार्वत्रिक निवडणूकाचा प्रभाग निहाय मतदार यादीचा कार्यक्रम संबंधाने वरील 20 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी 01 डिसेंबर 2020 (मंगळवार ) रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादया व सुचना संबंधित ग्रामपंचायतीचे सुचना फलकावर, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, पंचायत समिती व तहसिल कार्यालय येथील सुचना फलकावर सर्व नागरीकांच्या अवलोकनार्थ प्रसिध्द करण्यात आली आहे .
प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग निहाय मतदार यादीवर कोणत्याही नागरीकांच्या आक्षेप, हरकती व सुचना असल्यास त्या आक्षेप, हरकती व सुचना तहसिल कार्यालय साकोली येथील निवडणूक विभागात सोमवार 07 डिसेंबर 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. 07 डिसेंबर 2020 नंतर सादर केलेल्या आक्षेप, हरकती व सुचनांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. असे तहसिलदार साकोली यांनी कळविले आहे.





