31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता चोरट्यांचा एलसीबीने आवळल्या मुसक्या

चोरट्यांचा एलसीबीने आवळल्या मुसक्या

0
148

blank

चंद्रपूर—-कुलूपबंद घरी घरफोडी करून सोने, चांदीचे दागिने लंपास करणार्‍या चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने मुसक्या आवळल्या असून, चंद्रपूर जिल्ह्यासह भंडारा येथील घरफोडी उघड केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ६८ हजार २६0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अमोल आदेश इलमकर (२0), ज्ञानेश्‍वर गुलाब बोरकर (२३) दोघेही रा. दुगार्पूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
चंद्रपूर शहरातील जोडदेऊळ पठाणपुरा रोड परिसरातील कुलूपबंद घर हेरून सोन्याची गोप, झुमका पळविण्यात आल्याची तक्रार रामनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्यासोबतच शहर पोलिस स्टेशन हद्दीतील दिशा अपार्टमेंट, घुग्घूस पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्‍या शातकराम परिसर, रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या चांदमारी परिसर येथील कुलूपबंद घरे हेरून घरफोडी केल्याची तक्रार संबंधित पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे येताच त्यांनी आपले सूत्रे गतीने फिरवून अमोल इलमकर, ज्ञानेश्‍वर बोरकर यांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी चंद्रपूरसह साकोली येथेही घरफोडी केल्याची कबुली दिली. यावेळी चोरट्यांकडून सोन्याचा झुमका, गोप, चखदिवा ग्लास, चांदीची कटोरी, नंदादीप, सोन्याचे रिंग, कानातले, रोख सात हजार रुपये, चाळ, मंगळसूत्र, चांदीची मूर्ती असा एकूण ६८ हजार २६0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, संजय आतकुलवार, महेंद्र भुजाडे, अमजद खान, चंदू नागरे, अविनाश दाखमवार, कुदनसिंग बावरी, प्रशांत नागोसे, नितीन रायपुरे यांनी केली.

blank