33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्ताने दिव्यांगांना ट्रायसिकल, ई-ट्रायसिकल व व्हीलचेअरचे वाटप

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्ताने दिव्यांगांना ट्रायसिकल, ई-ट्रायसिकल व व्हीलचेअरचे वाटप

- अदानी फाउंडेशनचा उपक्रम

0
64

blank

तिरोडा,दि.06ः अदानी फाउंडेशन तिरोडा द्वारा आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडा च्या गेट क्रमांक 2 वर अदानी पावर प्रमुख  कांती बीश्वास यांच्या मार्गदर्शनाखाली covid-19 नियमांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याअंतर्गत अदानी फाउंडेशन च्या कार्यक्षेत्रातील 8 गावातील 15 दिव्यांगांना 8 ट्रायसिकल 4 ई- ट्रायसिकल व 3 व्हीलचेअर चे वाटप करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने अदानी पाँवरचे  अशोक मिश्रा,हरिप्रसाद अडथळे,ए.पी.सिंग,मोहन रमण, व काचेवाणी सरपंच लवंगदास मंडारी प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यानंतर दुपारी 3 वाजता दिव्यांग करीता असणाऱ्या विविध योजनेची माहिती  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी वेबिनारच्या माध्यमातून दिव्यांग व त्यांच्या परिवारातील सदस्यांना दिली. या वेबिनार मध्ये 8 गावातील दिव्यांग व त्यांच्या कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अदानी फाउंडेशन हेड नितीन शिराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अदानी फाउंडेशनचे स्वप्निल वाहने व हेल्पेज इंडियाचे कर्मचारी आणि संगिनी यांनी परिश्रम घेतले.

blank