38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News ISI शी संबंधित 5 संशयितांना अटक, यातील 2 पंजाब आणि 3 काश्मीरचे

ISI शी संबंधित 5 संशयितांना अटक, यातील 2 पंजाब आणि 3 काश्मीरचे

0
301

blank

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)ः दिल्ली पोलिसांनी 5 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. शकरपूर भागात ही कारवाई करण्यात आली. याआधी चकमकही झाली होती. पोलिसांच्या मते ते कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, ते ISIच्या नार्को टेररिझम नेटवर्कशी जोडलेले आहेत. अटक केलेल्यापैकी 2 पंजाबचे आणि 3 काश्मीरचे आहेत. शब्बीर अहम, अय्यूब पठाण, रियाज राठर, गुरजीत सिंह आणि सुखदीप सिंह अशी त्यांची नावे आहेत. त्यातील एक पंजाबचे शौर्य चक्र विजेता कार्यकर्ता बलविंदर यांच्या हत्ये मध्येही सहभागी होता.

जम्मू-काश्मीरचा क्रमांक असलेल्या पांढऱ्या कारमध्ये सवार असलेल्या संशयितांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोळीबार सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. हे संशयित JK 04B 8173 या कारमध्ये होते. संशयितांपैकी एकाचा पंजाबमधील शौर्य चक्र विजेता कार्यकर्ता बलविंदर सिंग यांच्या हत्येमध्ये हात असल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले.

blank

दहशतवाद्यांनी 17 ऑक्टोबर रोजी बलविंदर यांची हत्या केली होती. बलविंदर सिंह यांनी पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांच्या काळात शौर्याने दहशतवाद्यांचा सामना केला होता. त्यांच्यावर 42 वेळा हल्ले झाले होते. यामुळे त्यांना कुटुंबासह शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

blank