29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता सागाची अवैध वृक्षतोड व वाहतूक : वनविभागाच्या कारवाईत 5 आरोपींना अटक

सागाची अवैध वृक्षतोड व वाहतूक : वनविभागाच्या कारवाईत 5 आरोपींना अटक

0
332

blank

अर्जुनी मोरगाव,दि.09ः-तालुक्यातील रामघाट वनक्षेत्रातून अवैधरित्या सागाची वृक्षतोड करुन वाहतुक करण्यात येत असल्याच्या गुप्त माहितीवर वनविभागाच्या पथकाने घातलेल्या धाडीत 5 आरोपींना ताब्यात घेत सुमारे 14 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.8 डिसेंबरच्या रात्री रामघाट -१ बीट  येथून अवैधरीत्या सागवान वृक्षतोड करून वाहनाद्वारे वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच केलेल्या कारवाई दरम्यान रामघाट बिट कक्ष क्र. 254 ब राखीव वन येथे वाहन क्रमांक एमएच 35 एजे 1807, टाटाएस वाहनाद्वारे 0.348 घनमीटर सागाचे 13808 रुपये किमतीचे साग अवैधरित्या वाहतूक करत असताना पकडून आरोपींना वनकायद्यानुसार अटक करुन त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले.अटक करण्यात आलेल्या मध्ये सूर्यभान तुकाराम राणे वय 52, राहणार- माहूरकुडा,दुशंत मधुकर कापगते, वय 27 राहणार- निलज,मारुती सदाशिव मळकाम, वय 62, राहणार- अर्जुनी मोरगाव,संदीप मारुती मळकाम, वय- 29, राहणार- अर्जुनी मोरगाव व पांडुरंग मोंगसु शहारे, वय-66, राहणार- अर्जुनी मोरगाव यांचा समावेश आहे.
या आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) अ, ड, फ; कलम 41; कलम 52(1) व कलम 65(अ) अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आले आहे.ही कारवाई नवेगावबांधचे प्रकाष्ट निष्कासन अधिकारी तथा सहा.वनसरंक्षक दादा राऊत,वनपरिक्षेत्राधिकारी बी.टी.दुर्गे,वनपाल गोटाफोडे,वनरक्षक राणे,लाडे,बर्डे व वनमजूर फाये व मेश्राम यांनी केली.

blank