
लाखांदूर,दि.09ः तालुक्यातील चप्राड पहाडी जवळ शेत शिवारात 35 वर्षीय युवकाच्या मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची प्राप्त माहिती झाली . मृतक गुरुदास यशवंत मसराम राहणार मेंढा . चपराळा येथील रहिवासी असल्याची ची माहिती मिळाली गेल्या चार दिवसापासून गुरुदास मसराम हा गावात दिसत नसताना उलट-सुलट चर्चेला पेव फुटले होते. दरम्यान ८ डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान लाखांदूर पोलिसांना पहाडी जवळ धनराज दिघोरे शेत शिवारात जवळ मृतदेह असल्याची माहिती मिळाल्याने लाखांदूर ते पोलीस निरीक्षक मनोहर करोटी . संदीप ताराम यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला . यावेळी मेंढा चपराळा येथील नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत होती.पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोहर करोटी च्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संदीप ताराम करीत आहेत .





