
तिरोडा : शहरात व ग्रामीण भागात चोर्या व घरफोड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी प्रोत्साहन देणारी मोहीम सुरू करणार आहे. आपण प्रतिबंध व शोध (Prevent and Detect) यावर अधिक भर देणार असून पोलिसांना सुज्ञ नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असे मत तिरोडा पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी व्यक्त केले.
येथील पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे स्थानांतरण गोंदिया एसपी कार्यालयात झाले. नवीन पोलीस निरीक्षक म्हणून योगेश पारधी बुधवारी रुजू झाले. तिरोडा शहरात चोरांची टोळी सक्रिय असून कुलूपबंद घरे फोडण्याचे प्रमाण अधिक असून यावर आळा घालण्यासाठी व चोरांना पकडण्यासाठी आपण काय नियोजन आखाल? या प्रश्नाचे उत्तर देत त्यांनी तूर्तास आपण शहराचा अभ्यास करणार आहोत. सुज्ञ व सधन नागरिकांना Indoar व Outdor सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी प्रोत्साहन देणारी मोहीम सुरू करणार आहे. शिवाय मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी नगर परिषदेशी पत्रव्यवहार करणार आहे. याशिवाय नागरिकांनी सुद्धा संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली बघून पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे ते म्हणाले.
Prevent व Detect यावर विशेष लक्ष
तिरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी तसेच इतर गुन्हे घडू नये, यासाठी आपण नियोजन करणार आहोत. प्रतिबंध व शोध यावर विशेष लक्ष असेल. घरफोडी व इतर गुन्हे घडू नये यासाठी प्राधान्याने प्रतिबंधावर भर असेल. पण गुन्हा घडला तर शोधाला विशेष प्राधान्य देवून लवकरात लवकर आरोपींना पकडणे हा उद्देश असेल. पोलीस ठाण्यात अधिकार्यांची संख्या कमी असून आपण सहकारी अधिकार्यांची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे, असे ते म्हणाले.
मागील घरफोडया detect करणार
तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या क्षेत्रात 2019 मध्ये 12 घरफोड्या झाल्या होत्या. तर 2020 मध्ये आतापर्यंत 10 घरफोड्या झाल्या. यातील 3 घरफोड्या डिटेक्ट झाल्या असून 7 घरफोड्यांचे तपासकार्य सुरू आहे. या डिटेक्ट न झालेल्या घरफोड्यांचा संपूर्ण तपशील पोलीस निरीक्षक पारधी यांनी तात्काळ अधिनस्त कर्मचार्याकडून मागवून घेतले. या 7 घरफोड्या डिटेक्ट करण्याकडे विशेष लक्ष देणार आहोत, असे ते म्हणाले. कोरोनामुळे मागे चार महिने नागरिक घरीच होते. त्यामुळे घरफोड्या घडल्या नाही. परंतु, नियम शिथिल झाल्याने नागरिक आपल्या नोकरी-व्यवसायावर जात आहेत. त्यामुळे आता घरफोड्यांचे प्रमाण वाढत असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आपण कसोसीने प्रयत्न करू व पेट्रोलिंग सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
शिक्षितांकडून लेखी तक्रारी घेण्याचे आदेश
तक्रारदारांकडून तोंडी तक्रारी घेतल्यास पुढे काही विसंगती निर्माण होतात. त्यामुळे शिक्षित तक्रारदारांकडून लेखी, लिखित तक्रारी घ्यावे, असे आदेश पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी आपल्या सर्व अधिनस्त कर्मचार्यांना दिले.





