
गोरेगाव–खरीप हंगाम आटोपून आता शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. खरीपातील उत्पन्नाची तूट भरून काढण्यासाठी शेतकरी जोरकसपणे पर्शिम घेत आहे. परंतु, महावितरणच्या कारभाराने सध्या शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे शेतकर्यांना रब्बी पीक घेण्यासाठी नियमित विद्युत पुरवठा करण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे. या संदर्भात तहसीलदार व विद्युत अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
खरीप हंगामात अस्मानी व सुल्तानी संकटाने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. हाती आलेले उत्पादन समाधानकारक नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशावेळी उत्पन्नातील तूट भरून काढणे कठीण झाले आहे. असे असले तरी खरीपातील तुट रब्बी पिकातून भरून काढण्यासाठी शेतकरी लगबगीने कामाला लागला आहे. परंतु, महावितरणतर्फे विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकर्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
तालुक्यात सिंचनाची सोय बर्याचपैकी झाल्याने आता रब्बी पिक घेण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. सध्या विद्युत वितरण कंपनीने लोड वेडिंग चालू केल्याने शेतकर्यांना सिंचनासाठी विद्युतची गरज असल्याने विद्युत वितरण कंपनीने शेतकर्यांना चोवीस तास विज पुरवठा द्यावा, अन्यथा मोठे आंदोलन छेडणार असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. या संदर्भात तहसीलदार व विद्युत अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बहुसंख्य शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.





