
सिहोराः- आंतराज्यीय सिमेवर आणि भंडारा जिल्हयाच्या अंतिम टोकावर असलेल्या वारqपडकेपार गावाच्या सिमेत मध्य प्रदेशचा वाळू तस्करांनी अवैधरित्या कब्जा करून चांगलाच धुमाकूळ माजविला आहे. वारqपडकेपार गावाच्या सिमेतून अवैधरित्या रेतीचा उपसा करून मध्य प्रदेशच्या सिमेत डम्पींग करीत आहेत. यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असा सिमावाद चिघळला आहे. यात अप्रिय घटना घडण्याची श्नयता वर्तविल्या जात आहे. प्रशासनाने दखल घ्यावी म्हणून उपविभागीय अधिकारीतुमसर यांचेकडे ९ डिसेंबर रोजी तक्रार सुद्धा केल्या गेली आहे. परंतु अजूनपर्यंत दखल घेतल्या गेली नसल्याचे सांगीतले जाते आहे. मध्यप्रदेशच्या सिमेत चिचोली तर महाराष्ट्राचा सिमेत वारqपडकेपार गाव आहे. यातच बावनथडी नदी वाहात आहे.

मध्य प्रदेश सरकारने जरी रेतीचे घाट लिलाव केले असले तरी मध्य प्रदेशातील रेती तस्करांना महाराष्ट्राचा सिमेतुन दररोज ४०० ते ५०० ट्रक रेतीचा उपसा करून डम्पींग केली जात आहे. हा प्रकार सतत एक महिन्यापासून सुरू आहे. या प्रकारामुळे गावातील पाण्याची पातळी खोल जात आहे. सिमा वाद मिटविण्यासाठी वारqपडकेपारच्या सरपंचांनी वगावकèयांनी पुढाकार घेतला असता मध्य प्रदेशच्या चिचोली गावचे सरपंच व वाळू तस्करांनी दबंगगिरी दाखविल्यामुळे ळयांना अप्रिय घटनेचे गांभीर्य ओळखून माघारी परतावे लागल्याचे सांगीतले जात आहे. ही परिस्थिती सोंडया व घानोळ गावातही सुरू असून ही दोन्ही गावे महाराष्ट्राच्या सिमेतच आहेत हे येथे उल्लेखनीय. मध्य प्रदेश सरकारने जर रेतीचे घ्ज्ञाट लिलाव केले आहे तर सिमावाद सुद्धा त्याच सरकारने निकाली काढावे लाखो रूपयाचा महसूल मध्यप्रदेश सरकारला व रेती मात्र, महाराष्ट्राची हे मध्य प्रदेश सरकारचे अशोभनीय व निदंनीय कृत्य आहे. याला कोठे तरी लगाम लावण्यात यावी अशी मागणी ग्रामवासीयांची आहे.





