
गोंदिया.-अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा गोंदिया च्या वतीने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘३८ वा वर्धापन दिन’ साजरा करण्यात येत आहे. त्या निमीत्ताने ‘बाबा ते बाबा’ अभियानांतर्गत १३ व १४ डिसेंबरला दोन दिवसीय ऑनलाइन प्रबोधन मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१३ डिसेंबरला ‘ जादूटोणा व भानामती’ याविषयी यशवंत कावळे यांनी, ‘संत गाडगेबाबा’ यांच्या विषयी पद्मजा मेहेंदळे यांनी, ‘करोना काळातील अंधश्रद्धा’ याविषयी यशवंत फुलकटवार यांनी,’संमोहनाचे शरीरावर व मनावर होणारे परिणाम’ याविषयी मयाराम मेळे यांनी,’गीत गायन’ सविता उके यांनी, ‘ज्योतिष्य’याविषयी डाॅ.प्रकाश धोटे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सुनंदा भूरे वाडीभस्मे यांनी केले.
त्याचप्रमाणे १४ डिसेंबरला ‘ पारंपारिक लोकसमज आणि प्रथा समज’ याविषयी विजय मांढरे यांनी,’महिलांचे आरोग्य व अंधश्रद्धा ‘या विषयी डाॅ.
सुजाता ताराम यांनी,’संमोहन म्हणजे काय?गैरसमज,फायदे,उपयोग’याविषयी प्रा.सुनंदा भूरे यांनी,’साप व अंधश्रद्धा ‘ याविषयी दिलीप चाटोरे यांनी,’अंनिस व छत्तीसगड दौरा’ या विषयी रामरतन रेला यांनी आणि ‘भूत व देव अंगात येणे ‘ याविषयी डॉ. प्रकाश धोटे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.सविता उके यांनी केले.
सदर दोन दिवशीय अंनिसच्या ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रमाला जिल्ह्यातील व तालुक्यातील अंनिसचे पदाधिकारी,कार्यकर्ते व श्रोते यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
१४ डिसेंबर २०२० ला झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, गोंदिया YouTube LIVE कार्यक्रम खालील लिंक वर जाऊन बघा




