
गोंदिया,दि.16ः-राज्यात सध्या कोवीड-19ची परिस्थीती असून राज्यसरकार आर्थिक टंचाईत आहे.त्यामुळे इतर सर्व कांमाच्या बांधकामाना मंजुरी दिलेली नाही.परंतु गोंदियाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 मध्ये सध्या सीआर व एसआर(CR/SR)वर्कमध्ये 2 लाखापासून ते 3 लाखापर्यंतच्या काही कामांचे आदेश काढण्यात येत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.यासंदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता एसआर कामांना अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही.मात्र सीआरच्या काही कामांना तत्कालीन कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांनी मंजुरी दिली होती.त्यानंतर त्या कामांची मंजुरी प्रभारी कार्यकारी अभियंता जावेद यांनी पदभार स्विकारताच रद्द करीत स्थगिती दिली.त्या स्थगिती दिलेल्या कामांचेच पुन्हा कार्यारंभ आदेश देण्याचा काम बांधकाम विभागात सुरु असल्याची चर्चा बाहेर आली आहे.यामध्ये 15-16 कामांना मंजुरी असताना त्या कामांचे 50-70 काम तयार करुन त्या कामांना मंजुरी मिळावी व संस्थेला काम मिळावे याकरीता जिल्हा उपनिबंधकाकडे पाठविण्यात आल्याचीही चर्चा आहे.मात्र स्थगित असलेले काम आणि नव्या कामांना मंजुरीच नसताना ही यादी तयार कुठून झाली,कुणी केली डीडीआरकडे पाठविण्यासाठी कुणी पुढाकार घेतला असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.
विशेष म्हणजे या सर्व प्रकरणाबाबत प्रभारी कार्यकारी अभियंता श्री जावेद यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्यात आले असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांची योग्य भूमिका काय हे कळू शकले नाही.मात्र सेवानिवृत्त व तत्कालीन कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांना विचारणा केली असता आपण सीआरच्या 15-20 कामांना मंजुरी दिलेली होती.मात्र काही कंत्राटदार घोळ करीत असल्याचे आपल्या सेवानिवृत्तीनंतर प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आल्याचे बेरार टाईम्सशी बोलतांना सांगितले.तर शाखा अभियंता दुबे यांना विचारणा केल्यावर त्यांनीही या कामाबाबत अद्याप माहिती नसून कुठलेच सीआरच्या कामांना मंजुरी नसल्याचे सांगितले.तर अभियंता पठाण यांनी मात्र आपणास काहीही यासंदर्भात माहिती नाही आपण दुबे यांच्याकडून प्रभार घेतलेला आहे.सीआरच्या कामाच्या कार्यारंभ आदेश व त्यासाठी डीडीआरकडे प्रस्ताव पाठविण्यात येत असल्याबाबद माहिती नसल्याचे सांगितले.





