
तिरोडा:- राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शेतकरी व नागरिकांच्या पदरी निराशा आलेली असून हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याबाबतचे चित्र दिसून येत आहे या चुकीच्या धोरणाचा विरोध म्हणून व मागण्या पुरणे करण्यासंदर्भात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,शेतकरी दिनांक २१ डिसेम्बर २०२० दुपारी १२.०० वाजेपासून तहसील कार्यालय तिरोडासमोर धरणे आंदोलनावर बसणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने धान उत्पादक शेतक-यांचे आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी न करणे, वेळेवर सात बारा उपलब्ध न होणे, शासकीय धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध न होणे परिणामी शेतकऱ्यांना एक एक महिना वाट बघावी लागणे,ज्याशेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मावा तुडतुडाचे नुकसान झाले नाही अशा शेतक-यांचे धान विक्रीची मर्यादा १३ क्विंटल ऐवजी ३३ क्विंटल धान खरेदी करणे,धान खरेदीकरिता आनलाईन नोंदणीची जवाबदारी हि धान खरेदी केंद्राकडे असल्यामुळे आनलाईन नोंदणीकरिता १५ ते २० दिवसापर्यंत वाट बघावी लागते हि आनलाईन नोंदणी शासनातर्फे केल्यास वेळेची बचत होवून धान खरेदी वेळेवर होईल तेव्हा आनलाईन नोंदणी शासनातर्फ़े करण्यात यावी,एकत्रित सातबाराखातेधारकांना सहमतीपत्राची अट रद्द करणे, हमाली कमी करणे, ४० किलो वर १.५ किलो सोक कपात करणे,विक्री केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ देयके देण्यात यावे, पिकविम्याची रक्कम वेळेवर देणे,कोव्हीड -१९ कालावधीतील विजबिलाट सुट देण्याबाबत शासनाने सप्टेंबरमध्ये घोषणा केली होती परंतु त्यावर कोणत्याहि प्रकारची कार्यवाही झालेली नसल्यामुळे जनतेवर विजबीलाचा आर्थिक बोजा निर्माण झालेला आहे यावर तोडगा काढून कोव्हीड -१९ कालावधीतील वीजबिलात शासनाने सूट देण्यात यावी, पूरग्रस्तांना पूर्णपणे मदत देण्यात यावी अशा अनेक मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात २१ डिसेम्बर २०२० रोज सोमवारला दुपारी १२.०० वाजेपासून आमदार विजय रहांगडाले तिरोडा गोरेगाव विधानसभा यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी तहसील कार्यालय तिरोडासमोर धरणे आंदोलनावर बसणार आहेत.





