35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी बजाज चौकात आंदोलन

शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी बजाज चौकात आंदोलन

0
36

blank

वर्धा,दि.20ःः शेतकरी विरोधी केंद्र सरकारने कायदे रद्द करण्यासाठी बजाज चौक, वर्धा येथे अविरत सुरू असलेल्या आंदोलनात चौथ्या दिवशी दिनांक १९ डिसेंबर ला महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समिती, अखिल भारतीय अंधर्शद्धा निर्मूलन समिती, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ व नर्मदा बचाव आंदोलन संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शेतकर्‍यांच्या नाव पुढे करून केंद्र सरकारने देशातील कोणत्याही शेतकरी कार्यकर्त्यांशी अभ्यासकांशी संघटनांशी आंदोलकांशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता केवळ आवाजी मताने शेतकरी विरोधी कायदे पारित केले.
देशातील बहुसंख्य लोकांना अंधारात ठेवून शेतकर्‍यांच्या नावावर सरळ सरळ शेतकरी शोषणाचेच हे कायदे भाजप सरकारने केले आहे. या कायद्यामुळे मोठ्या व्यापार्‍यांना सर्व परवाने रद्द करण्यात आले आहे. कोणत्याही परवान्याशिवाय कुठेही शेती उत्पादन खरेदीसाठी संपूर्ण रान मोकळे करून देण्यात आले आहे. सोबतच दुसर्‍या अत्यावश्यक सेवा वस्तू कायद्यात व्यापार्यांना धान्य साठवण्यासाठीची मयार्दा काढून टाकलेली आहे. तिसर्‍या कायद्यात कुणीही व्यक्ती कंपनी कितीही शेती कुठेही शेती पाहिजे त्या पद्धतीने शेती ठेकेदारी पद्धतीने करता येईल.
हे कायदे नाव शेतकर्यांचे असले तरी यात संपूर्ण फायदा मुठभर मोठ्या भांडवलदारांच्या घशात टाकण्याचा हा वर्तमान केंद्र सरकार चा स्पष्ट उद्देश आहे हे दिसत आहे अशा प्रकारचे मार्गदर्शन किसान अधिकार अभियान चे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी केले. आजच्या धरणे आंदोलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव गजेंद्र सुरकार यांनी केले. यावेळी अ.भा.अ.नि.स. च्या संघटिका प्रा. सुचिता ठाकरे, पंकज वंजारे, प्रा. अरून हर्षबोधी , प्रकाश कांबळे, निलेश गुल्हाने, एन ए पी एम युवराज गटकर , अक्षद सोमनाथे , सारिका डेहनकर, योगीता मानकर, वैशाली ठाकरे यांनी या कायद्यांचा निषेध करित शेतकरी आंदोलनात मतप्रदर्शन केले.
या आंदोलनात प्रकाश कांबळे, अस्लम पठाण, मंगेश शेंडे, संजय भगत, भारत कोकावार, विक्की सवाई परिवर्तनाची गीतांचे सादरीकरण केले.
यावेळी विविध संघटनेचे निखिल जवादे, रविंद्र पुनसे, अथर्व भिंगारे , अजय इंगोले, मुकुंद नाखले, अनिल मुर्डिक, सुरेश बोरकर, सुरज वानखेडे, किशोर ढाले, सान्वी वंजारे, मिनल इथापे, प्रतिभा ठाकुर, सुनंदा वानखेडे, अमृत मडावी, स्मिता गोलाईत, संजिवनी चौधरी, रुपाली पाटील, मनोहर लांडगे, शिला झाडे, ममता बालपांडे, अँड के पी लोहवे, सुरेश बर्डे, गणेश भालेराव यांच्या सह मोठ्या संख्येने अंधर्शद्धा निर्मूलन समितीचे, प्रजासत्ताक शिक्षक संघटनेचे व अनेक संघटनांचे सदस्य कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक युवराज यांनी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाची सद्यस्थीती,पुढील आंदोलनाची दिशा,आदी बाबत माहीती देवून ग्रामिण भागात जावून शेतकर्‍यांना तिन शेतकरी कायद्याची माहीती देण्याचे आव्हाण केले.किसान अधिकार अभियानचे प्रेरक अविनाश काकडे यांनी तिन्ही कायदे त्याचे होणारे दुष्णपरीणाम याबाबत सविस्तर माहीती दिली.
यावेळी अरूणकुमार हर्षबोधी, प्रा. श्रीराम मेंढे अमिर अजानी, सुचिता ठाकरे, अँड. लोहवे, खोबे , डाँ.धनंजय सोनटक्के, डॉ.सिध्दार्थ बुटले, सारीका डेहनकर, अँड.पुजा जाधव अक्षय सोमनाथे, ओ.बि.सी.महिला महासंघाच्या योगीता मानकर,सिटूचे संजय भगत, आयटकचे असलम पठाण ,आनंद निकेतन च्या सुषमा शर्मा तर मान्यवरांमध्ये अर्थव भिंगारे,सुदाम देशमुख,प्रकाश कांबळे, आदींनीही मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व संचालन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधानसचिव गजेन्द्र सुरकार यांनी केल. आभार भरत कोकावार यांनी केले. याआंदोलनात विविध संघटनेचे खालील मान्यवर पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank