37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ उडाण स्पोर्टस व कँरीअर अकँडमी तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

उडाण स्पोर्टस व कँरीअर अकँडमी तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
53

blank

गोंदिया :– विदर्भ बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था देवरी द्वारा संचालित उडान स्पोर्ट्स व कॅरियर अकॅडमी फुलचुर तर्फे सावित्रीबाई फुले यांचे 190 वी जयंती संस्थेच्या सचिव सौ सुषमाताई विनोदकुमार माने यांच्या मार्गदर्शनात साजरी करण्यात आली.याप्रसंगी अकॅडमीत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी पूर्व तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सकाळी आठ वाजता ग्राउंड वर सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमे समोर दीप प्रज्वलित करून माल्यार्पण केले. तद्वतच केक कापून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन चरित्र व कार्यावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत कु. खुशबू चिखलोंडे,कु. कांचन गिरी व पाचे या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमात अकॅडमीचे संचालक व क्रीडा प्रशिक्षक छोटू रंहागडाले, प्रा.विनोदकुमार माने तसेच अकॅडमीत प्रशिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन खुश्बु चिखलोंढे तर आभार कांचन गिरी यांनी मानले.

blank