
नागपूर: वंचित घटक असलेल्या ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी एकत्र येऊन ओळख तयार करावी. योजनांची माहिती करुन लाभ घ्यावा, याच घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वारसा महाज्योतीच्या निमित्याने शासन पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन महाज्योतीचे संचालक डॉ.बबनराव यातवाडे यांनी केले.
महाज्योतीच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून आयोजित व्याख्यान आणि सत्कार सोहळ्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, सामाजिक कार्यकत्र्या वंदना वनकर, अॅड.रेखा बाराहाते, डॉ. अंजली साळवे, कार्यकारी अधिकारी अतुल वासनिक उपस्थित होते.
यावेळी प्रदीपकुमार डांगे यांनी महाज्योतीच्या माध्यमातून सुरु असलेल्या आणि प्रस्तावित उपक्रमांची माहिती दिली. वंदना बनकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मासिक विवेचन केले. अॅड, रेखा बाराहाते आणि डॉ. अंजली साळवे यांनी सावित्रीबाई आणि आजची स्त्री या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. अतुल लोंढे यांनी महाज्योतीच्या माध्यमातून आपल्या पारंपरिक उत्पादनांना योग्य बाजारपेठा मिळवून देण्यासाठी योग्य मार्केqटग करावी, अशी सुचना केली. कार्यक्रमाचे नियोजन व आभार महाज्योतीचे समन्वयक उमेश कोरराम यांनी मानले. तर संचालन दिव्या शहारे यांनी केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून कुठलीही प्रसिद्धी न करता आपापल्या क्षेत्रात समाजकार्य करणाèया तीन महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकत्र्या छाया कुरुटकर, नीता इटनकर, रंजना सुरुजुसे यांना शाल, श्रीफळ,स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सम्मानित करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
संपूर्ण राज्यभरातून सुमारे साडेचार हजारांवर निबंध प्राप्त झाले. सावित्रीबाी फुले जयंतीचे औचित्य साधून सर्वप्रथम सातारा जिल्ह्याचा निकाल जाहीर करण्यात आला. यात ज्योती कुणाल साळुंखे हिने प्रथम क्रमांक पटकावला.




