
तिरोडा : महिलेच्या घरात शिरून तिचा विनयभंग करणार्या आरोपीला न्यायालयाने एक वर्ष कारावास व 500 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 10 दिवसांची वाढीव शिक्षा असा दंड ठोठावला आहे.तिरोडा पोलीस ठाण्यात 5 डिसेंबर 2020 रोजी महिलेने तक्रार दिली होती. त्यात आरोपी शंकर ईसाराम हटवार रा. कोयलारी याने सदर महिलेच्या घराच्या मागील दरवाज्यातून आत येवून तिचा विनयभंग केल्याचे नमूद होते. तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम 452, 354, 354 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार पृथ्वीराज जांभूळकर यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केला होता.
त्यानंतर सदर प्रकरण तिरोडा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालले. या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विकास सी. कारेमोरे यांनी 7 जानेवारी रोजी निकाल दिला आहे. त्यानुसार आरोपीला भादंविच्या कलम 542, 354, 354 (अ), कलम 284 (2) सी.आर.पी.सी. अन्वये एक वर्ष कारावासाची शिक्षा व 500 रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास 10 दिवसांची वाढीव शिक्षा सुनावली आहे. आरोपीकडून अॅड.माळेवर व सरकारकडून अॅड.एम.एम. राऊत यांनी काम पाहिले.





