33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ माजी आमदार बाळा काशिवार यांची उसगांव/चांदोरी येथे सांत्वना भेट

माजी आमदार बाळा काशिवार यांची उसगांव/चांदोरी येथे सांत्वना भेट

0
92

blank

साकोली दि.10: भंडारा जिल्हा रुग्णालयात दि. ९ च्या मध्यरात्री आग लागून १० कोवळ्या नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे.साकोली तालुक्यातील उसगांव/चांदोरी येथील सौ हिरकन्या हिरालाल भानारकर यांच्या चिमुकल्याचा मृत्यु झाला. साकोलीचे माजी आमदार राजेश (बाळा) काशिवार यांनी सर्वप्रथम मृत चिमुकल्याच्या कुटुंबास भेट दिली.  या घटनेत आपल्या चिमुकल्यांना गमावलेल्या कुटुंबांच्या दुःखात मी आणि माझा परिवार सहभागी आहे अशी संंवेदना हया वेळी माजी आमदारांनी वयकत केेत्व. ह्या भेटप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष  लखन बर्वे, भाजपा साकोली  शहर अध्यक्ष  किशोर पोगड़े,माजी भाजपा तालुका अध्यक्ष रमेश खेड़ीकर किशोर बोपचे हे उपस्थित होते.

माजी आमदार बाळा काशिवार यांची मृतक उसगांव/चांदोरी येथे सांत्वना भेट

 

 

blank