35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ त्या परिवारास मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची मदत

त्या परिवारास मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची मदत

0
51

blank

अर्जुनी मोरगाव,दि.11ः भंडारा येथील सामान्य रुग्णालयात नऊ डिसेंबरच्या रात्री काळाने घाला घालीत 10 निष्पाप बालकांचा बळी घेतला.या दुर्घटनेत तालुक्यातील मोरगाव येथील सुषमा पंढरी भंडारी यांची नवजात जुही या मुलीचा आगीत होरपळून मृत्यू झाला. सदर घटना मन हेलावणारी आहे.या दूरघटनेत मृत्यु झालेल्या कुटुंबियांना महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत जाहीर केली.सदर मदत चोवीस तासांच्या आत पीडित कुटुंबाना देण्यात आली.यावेळी नायब तहसीलदार मुनींश्वर गेडाम ,भंडारा येथील मंडळ अधिकारी पी.टी. सतदेवें, सुरेशसिंह पवार,तलाठी प्रकाश कापगते ,ग्रामसेवक डी. एच .फुले,सरपंच विजया ऊके आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार कृष्णा गजबे यांची त्या परिवाराला सांत्वना भेट
भंडारा येथील सामान्य रुग्णालयात नऊ डिसेंबरच्या रात्री काळाने घाला घालीत 10 निष्पाप बालकांचा बळी घेतला.या दुर्घटनेत तालुक्यातील मोरगाव येथील सुषमा पंढरी भंडारी यांची नवजात जुही या मुलीचा आगीत होरपळून मृत्यू झाला. सदर घटना मन हेलावणारी आहे.सदर घटनेची माहिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांना तालुक्यातील कवठा येथे एका खाजगी कार्यक्रमात मिळाली.त्यानी हा कार्यक्रम आटोपून मोरगाव येथील भंडारी कुटुंबियांची भेट घेतली.मृतक मुलीच्या आई वडिलांचे सांत्वन केले.यावेळी नरेश हरडे,किरण बन्सोड,गणपत वाघाडे,सोनू रॉय,चेतन नारनवरे,योगेश बोरकर, यशवंत कुंभरे उपस्थित होते.

blank