पिंपरी चिंचवड दि.११_-,ड शहरात कुठेही काहीही सहकार्य लागले तर मोठ्या प्रमाणात सहकार्य करणार असे मनोगत रक्तदान शिबिरात आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू उद्योजक शंकरशेठ जगताप यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केले.प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.महाराष्ट्र राज्यात सर्व क्षेत्रात अग्रेसर आसलेल्या सामाजिक कार्यात अग्रेसर राहुन ज्यांनी जनसामान्यांच जगणं सुसह्य केलं अशी ऑर्गनायझेशन म्हणजे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन कोरोनाच्या काळात गोरगरिबांना सर्वोतोपरी मदत करून अनेकांना मदतीचा हात देउन अनेकांना जीवनदाना बरोबरच कोरोना नंतरची गरज ओळखून रक्ताचा तुटवडा आणि
रक्ताची गरज ओळखून वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन चे किरण शिंदे.आणि शिरीष देवरे आणि ऑर्गनायझेशनचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मिळून संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जातात.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान शिबिर घेत आहेत.१० जानेवारी रोजी WMO परिवारा तील PCMC ग्रुपने भव्य-दिव्य असा महा रक्तदान शिबीर रहाटणीतील विमल गार्डन येथे मोठ्या संख्येने पार पडले. रक्तदान शिबारासाठी प्रमुख आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, नगरसेवक संदीप अण्णा कस्पटे, प्रसाद कस्पटे. आणि संदीप आण्णा कस्पटे युवा मंच यांनी मोलाचे विशेष सहकार्य केले. या महारक्तदान शिबिरात देशातील सर्वात मोठे 803 रक्तदात्यांनी बांधवांनी रक्तदान केले. सर्व रक्त दात्यांना प्रशस्ती पत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रशिद्ध उद्योजक शंकर जगताप, डॉ.अजितसिंह पाटील, राज देशमुख सर, शर्मिला ताई शिंदे,आश्विनी देवकर ताई, चंद्रकांत नखाते ,निर्मालाताई कुटे नरेश खुळे, संदिप नखाते, दिनेश यादव, संकेत चौंधे, अजित कुलथे. गणेश जवळकर, सनी बारणे, विनोद तापकीर, विक्रांत गंगावणे, प्रकाश चौधरी, पराग जोशी, किरण नढे, कुणाल तापकीर, डॉ भागीरथ मोरे, भगवान गोडांबे , संदिप बोडके, दिपक तरस याच्या उपस्थितीत हा रक्तदान सोहळा पार पडला आज पर्यंतच्या झालेल्या रक्तदान शिबीराचे रेकॉर्ड ब्रेक केले. वर्ल्ड मराठा ऑर्गनाय झेशनने आज पर्यंत सामाजिक कामातील प्रत्येक उपक्रमात भाग घेऊन निस्वार्थी पणाने येथीलभाग समाजातील सर्व स्तरातील बांधवाना कोरोना काळात मदत केली आहे जेव्हा सर्व जग थांबलं होत तेव्हा फक्त वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन अगदी ग्राउंड लेव्हल पासून सोशल मिडीया परेंत सर्व स्तरात प्रत्येक गरजुला मदत करत होते कोरोना संकटकाळात WMO ने हजारो लोकांना रक्त तसेच प्लाझ्मा उपलब्ध करुन दिला तसेच असंख्य गरीब आणि गरजू बांधवाना व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड, इंजेक्शन, अन्न धान्य आणि दैनंदिन वस्तु उपलब्ध करुन दिले. याच बरोबर कोरून काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस बांधवाना व्हिटॅमिन सी च्या गोळ्या वाटप केल्या होत्या.




