
गोंदिया,- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 11 जानेवारी रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली.एक रुग्ण उपचारादरम्यान मृत पावला. आजपर्यंत 13,928 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 13,495 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 253 आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 180 रुग्णांचा मृत्यू झाला.





