29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता वडगांव जंगल पोलिसांची कार्यवाही 2 लाख 88 हजाराची दारू पकडली

वडगांव जंगल पोलिसांची कार्यवाही 2 लाख 88 हजाराची दारू पकडली

0
36

यवतमाळ –जिल्ह्यातील वडगाव जंगल पोलिसांनी 9 जानेवारीला  दारूभट्टी सुरू असताना भट्टीवर धाड घालून 2 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यावेळी श्रीकांत अंकूश मसराम (वय 45 वर्षे रा. चिचघट) याला अटक केली.आरोपी श्रीकांतला हातभट्टीची दारू गळतांना 27 प्लास्टिक ड्रम ज्यात प्रत्येकी 50 लिटर असा 1350 लिटर सडवा मोहफूल हातभट्टी दारू गाळण्यासाठी उपयोगी असलेला किंमत अंदाजे 10,800 रू.तसेच तीन मोठे ड्रम ज्यामध्ये 100 लिटर सडवा किंमत अंदाजे 24000 रु.22 तीनपत्र्याचे पिप्यात प्रत्येकी 15 लिटर मोह सडवा एकुण 330 लिटर किंमत अंदाजे 26400 रु.तीन प्लास्टिक दबकित प्रत्येकी 20 लिटर प्रमाणे 60 लिटर किंमत अंदाजे 6000 रु.मुद्देमाल व दारू गळण्याचे साहित्य एकुण 288000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरोधात कलम 65 क,ड,फ अन्वये कार्यवाही करण्यात आली.ही कार्यवाही वडगांव जंगल ठाणेदार पवन राठोड यांचे मार्गदर्शनात जमादार संतोष धकर्गे, आशिष उईके,अक्षय डोंगरे,नीलकमल भोसले आदींनी केली.

blank