
वाशिम, दि. १2 : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार, १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानादिवशी निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापनामधील कामगारांना मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा विशेष सवलत देण्यात यावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार औद्योगिक उपक्रम, शाळा, महाविद्यालये किंवा इतर आस्थापनामधील कामगारांना मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भरपगारी विशेष सवलत किंवा भरपगारी सुट्टी करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. आयोगाच्या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.




