32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

0
47

blank

गोंदिया- गोंदिया शिक्षण संस्था गोंदिया द्वारा संचालित जी.ई.एस.हायस्कूल व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पांढराबोडी येथे विद्यालयाचे प्राचार्य मा.बी.एच.जीवानी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊ आऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती विद्यालयात साजरी करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य मा.बी.एच.जीवानी, प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक एच.ए.नागपूरे,वरिष्ठ शिक्षक यु.सी.रंहागडाले, श्रीमती एस.आर. बघेले, आर.एस.रहमतकर, आर.एफ.निमावत,प्रा.कु.एस.सी.सुंकरवार, प्रा.सुनिल लिचडे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या तैलचित्रासमोर दीपप्रज्वलन करुन माल्यार्पण करण्यात आले, तद्वतच उपस्थित मान्यवरांनी जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.12 जानेवारी जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून विद्यालयाचे प्राचार्य बी.एच.जीवानी सर यांच्या मार्गदर्शनात विद्यालयात विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी  विविध ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कोविड 19 च्या अनुषंगाने खबरदारी घेत सर्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील प्रा.सुनिल लिचडे,श्रीमती एस.आर.बघेले, विनोदकुमार माने, डी.एस.साखरे, प्रदीप राठोड, बी.आर .मेश्राम, आर.एस.रहमतकर, प्रणय परशुरामकर,क्रीडाप्रशिक्षक जी.एम.दुधबरई, डी.जे. डोमळे,प्रा.राजेश चटर्जी, आर.एफ.निमावत,कु.एन.ए.बुराडे,कु.एस.एन.मोरघडे, कु.एम.पी.भोयर, एन.एस.अग्रवाल, विजय वासनिक, कान्हा बघेले, आर.बी.दमाहे,एम.सी.कोल्हाटकर, शक्ति मस्करे आदींनी अथक परिश्रम घेतले.

blank