34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता ग्रामपंचायत निवडणूक संबंधाने 10 दारू अड्यावर छापे, एकूण 8. 68 लाखांचा माल...

ग्रामपंचायत निवडणूक संबंधाने 10 दारू अड्यावर छापे, एकूण 8. 68 लाखांचा माल जप्त

0
56

blank

तिरोडा : ग्रामपंचायत निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे. ही निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी तिरोडा पोलिसांनी आज मंगळवार, दि. 12 जानेवारीला दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजतापर्यंत 10 अवैध दारू अड्यावर धाड घातली. यात एकूण 8 लाख 68 हजार 400 रूपयांचा माल जप्त करण्यात आला.

  • दिलीप घनश्याम बरियेकर रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा याच्या घरी हातभट्टी दारू, साहित्य आणि सडवा मोहफूल असा एकूण 1 लाख 52 हजार रूपयांचा माल मिळाला.
  • ईश्वर मदन बरियेकर रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा याच्या घरी हातभट्टी दारू, साहित्य आणि सडवा मोहफूल असा एकूण 1 लाख 55 हजार 200 रूपयांचा माल मिळाला.
  • अनिल कुवरदास बिंझाडे रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा याच्या घरी हातभट्टी दारू, साहित्य आणि सडवा मोहफूल असा एकूण 1 लाख 10 हजार 400 रूपयांचा माल मिळाला.
  • लता दिलीप खरोले हिच्या घरी हातभट्टी दारू, साहित्य आणि सडवा मोहफूल असा एकूण 1 लाख 15 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल मिळाला.
  • रवी राधेश्याम खरोले रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा याच्या घरी हातभट्टी दारू, साहित्य आणि सडवा मोहफूल असा एकूण 1 लाख 05 हजार 600 रूपयांचा माल मिळाला.
  • छाया सोविंद बरियेकर रा. सिली हिच्या घरी हातभट्टी दारू, साहित्य आणि सडवा मोहफूल असा एकूण 1 लाख 14 हजार रूपयांचा मुद्देमाल मिळाला.
  • संजय सोविंद बरियेकर रा. सिली याच्या घरी हातभट्टी दारू, साहित्य आणि सडवा मोहफूल असा एकूण 1 लाख 08 हजार रूपयांचा माल मिळाला.
  • बिरन तुळशीराम राजघाट रा. पालडोंगरी हिच्या घरी 20 लिटर दारू (कि.1000 रुपये) मिळाली.
  • प्रेमलाल शिवा टेकाम रा. पालडोंगरी याच्या घरी 20 लिटर दारू (कि.1000 रुपये) मिळाली.
  • सुजिता रवींद्र सहारे रा. सातोना हिच्या घरी 100 लिटर दारू (कि. 6000 रुपये) मिळाली.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी आपल्या अधिनस्त पोलीस पथक सपोनि हनवते, एएसआय जांभूळकर, पोलीस हवालदार चेटुले, नापोशि बर्वे, बांते, महालगावे, कटरे, पोलीस शिपाई सव्वालाखे, प्रशांत काहलकर, मपोशि बावनथडे यांच्यासोबत केली.

blank