38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे मोठ्या प्रमाणात सदस्य निवडून आणण्याचा निर्धार करा- नगरविकास मंत्री...

जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे मोठ्या प्रमाणात सदस्य निवडून आणण्याचा निर्धार करा- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

0
41

blank

गोंदिया,दि.१३:: जिल्ह्याला विकास पथावर आणायचे आहे मात्र, यासाठी मायबाप जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. अशाप्रकारे येत्या काळात गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे मोठ्या प्रमाणात सदस्य निवडून आणण्याचा निर्धार करा, असे आवाहन नगरविकास मंत्री व सपंर्क मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आगामी काळात ग्रामपंचायतीच्या विकासाची जबाबदारी घेण्यास कटीबध्द असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गोंदीया जिल्हातील आमगाव येथे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मेळावा पार पडला. यावेळी  जिल्ह्या तालुक्यातील पदाधिकारी, युवा -शिवसैनिक, महिला आघाडी, किसान सेना पदाधिकऱ्यांसह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते

या प्रसंगी मंञी महोदयांनी अनेक विषयावर भाष्य केले व शिवसेनेची कार्यपद्धती, राबवलेल्या योजना स्पष्ट केल्या व शिवसेना पक्ष वाढीसाठी योगादान देण्यासह ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस यश संपादन करण्याचा कानमंञ दिला.

निवडणुकीच्या पार्श्वभमीवर आपण सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम केले तर आपले शिवसेना सदस्य विक्रमी संख्येने निवडून येतील. माझ्या मतदारसंघात एक ही शिवसेना पक्षाचा नगरसेवक नव्हता परंतु, आता भाजपाचे दोन नगरसेवक सोडले तर आपले ठाणे महापालीकेत सर्व शिवसेना नगरसेवक आहेत. प्रकाश जाधव यांच्या सारख्या कार्यकर्त्यांना आपण जिद्द, मेहनत, चिकाटी व संघटनेच्या बळावर खासदार केले आहे. या वेळी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी वातावरण निर्मिती तयार करणे आवश्यक असून त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून प्रचार करावा. त्याचबरोबर दुसऱ्या मतदारसंघातील जिल्हाप्रमुख ,मुख्य पदाधिकारी सेना सत्ताधारी यांनी ज्या ठीकाणी ताकद कमी आहे अशा ठीकाणी जावून देखील प्रचार करावा व पक्षाची ताकद वाढवावी. आपल्या ग्रामीण भागातील कार्यर्त्याचे बळ वाढवा विजय आपलाच होणार आहे असा विश्वास देखील श्री.शिंदे यांनी व्यक्त केला.

ठाणे जि.प आपल्याकडे नव्हती पण जिद्दीच्या जोरावर आपण जिल्ह्या परिषदेवर भगवा फडकवला. आपला कार्यकर्ता जेव्हा अङचणीत असेल तेव्हा आपण पदाधिकारी म्हणून त्यांना साथ द्या, मदत करा, विश्वासात घ्या ऐक्य दाखवा त्यांची हिम्मत वाढवा.
कोवीड काळात आपल्या महाआघाडी सरकारने मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी सर्वार्थाने लक्ष घातल्यामुळे कोवीड साथ नियंञणात आली आहे. अतिवृष्टी,साथरोग ,निसर्ग चक्रीवादळ
शेतीच्या अनंत अडचणी होत्या तेव्हा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी दहा हजार कोटीचे पॕकेज जाहीर केले त्यामुळे खर्या अर्थाने शेतकरी राजा सुखावला आहे. नगरविकास खात्याकडून सुधारित आदेश काढला असून आता 1500 चौ.फुट घरासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही तसेच
3000चौ.फुट घर बांधणी परवानगी केवळ पंधरा दिवसात मिळण्याचे बंधन आहे. यामुळे सामान्य मध्यमवर्गीय कुटूंबाना घरबांधणीचा ञास होणार नाही याची काळजी शिवसेनेने घेतली आहे. तसेच एफएसआयचा गैरवापर होणार नाही यासाठी नियमावली निर्माण केली आहे.गोंदीया जिल्ह्यात आपला शिवसेना पक्ष एक नंबरला आला पाहीजे असा निर्धार करण्याचे सूचना श्री. शिंदे यांनी केल्या.

आपण ग्रामपंचायतीचा उत्तम प्रचार केला आहे. भविष्यातही ग्रामपंचायतीला अनेक प्रकारे निधी उपलब्ध करुन देता येईल. या विभागाचा विकास साधण्यासाठी ग्रामस्तरावरील प्रकल्प निदर्शनास आणावेत व त्यास मुख्यमंत्री महोदयांमार्फत अनुमती मिळवून देण्याची जबाबदारी माझी राहील. गोंदीया जिल्ह्यासाठी शिवसेनेकडून दोन सुसज्ज रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील मंञी महोदयांनी जिल्हाप्रमुख यांना दिल्या. गोंदिया जिल्ह्याचा संपर्क मंञी या नात्याने मी आपल्या सर्व प्रकारच्या अङचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

blank