33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home शैक्षणिक महाराष्ट्र राज्य मराठी माध्यमिक शिक्षक संघाची गोंदिया जिल्हा कार्यकारिणी गठीत

महाराष्ट्र राज्य मराठी माध्यमिक शिक्षक संघाची गोंदिया जिल्हा कार्यकारिणी गठीत

0
106

blank

गोंदिया दि.13 जाने.-गोंदिया जिल्ह्यातील मराठी विषय शिकविणाऱ्या माध्यमिक शिक्षकांची महाराष्ट्र राज्य मराठी माध्यमिक शिक्षक संघाची गोंदिया जिल्हा कार्यकारणीचे गठण घनश्याम  (जी.डी) पटले यांचे निवासस्थानी गोरेगाव येथे आदीलोक विद्यालय बोळुंदाचे प्राचार्य कुवरलाल वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.याप्रसंगी गोंदिया जिल्यातील सर्व तालुक्यातील माध्यमिक मराठी शिक्षक उपस्थित होते.मराठी विषय शिक्षकांसाठी विविध चर्चासत्रे, उद्बोधन वर्गाचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच विविध स्पर्धाचे आयोजन करणे,मराठी भाषेचा विकासासाठी प्रयत्न करणे,मराठी भाषा विषयाच्या अनुषंगाने एस.एस.सी बोर्डाला सहकार्य करणे. या उद्देशाने संघाचे गठण करण्यात आले. कार्यकारिणीत अध्यक्षपदी सहाय्यक शिक्षक घनश्याम पटले  श्री तुकाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसा ता.आमगाव,कोषाध्यक्ष प्राचार्य  कुवरलाल वैद्य आदीलोक विद्यालय बोळुंदा ता.गोरेगाव, कार्यवाह श्रावण मडावी जि.प.हायस्कूल साकरीटोला ता.सालेकसा,मार्गदर्शक मनोज लुटे सुदामा हायस्कूल कटंगी/नागरा ता.गोंदिया, उपाध्यक्ष सौ.संकुतला पटले सरस्वती माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगाव, उपाध्यक्ष गंगाराम येळे ह.भा.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाडबांध ता.आमगाव, उपाध्यक्ष पुरुषोत्तम बोकडे शहीद मिश्रा हायस्कूल तिरोडा ता.तिरोडा,उपाध्यक्ष प्रकाश जनबंधू बाळासाहेब हायस्कूल शेंडा ता.सडक अर्जुनी, सहकार्यवाह विलास टेंभुर्णे फुलिचंद भगत विद्यालय कोसमतोंडी ता.सडक अर्जुनी,सहकार्यवाह डॉ. कु.ममता कुंभलवार आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमगांव, प्रसिद्धीप्रमुख विनोदकुमार माने जी.ई.एस.हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पांढराबोडी ता.गोंदिया, सदस्य ऋषीकांत दानवे विश्वकर्मा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुरदाडा ता गोंदिया, सदस्य जितेंद्र रंहागडाले श्रीराम विद्यालय चिचगड ता.देवरी,सदस्य काकाजी मडावी ह.भा.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाडबांध ता.आमगाव, सदस्य मिलिंद रामटेके मिलिंद विद्यालय चान्ना बाकटी ता.अर्जुनी मोरगाव आदींची जिल्हा कार्यकारणीत निवड करण्यात आली असून सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

blank