32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ 16 जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात-जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

16 जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात-जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

0
39

blank

गोंदिया,दि.14 : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची प्रक्रिया 16 जानेवारीला
सुरु होणार आहे. जिल्ह्यात चार ठिकाणी लसीकरण टोचणी केंद्रे कार्यरत राहणार असून यामध्ये केटीएस जिल्हा
सामान्य रुग्णालय गोंदिया, ग्रामीण रुग्णालय देवरी, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा व प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी चा
समावेश आहे. जिल्ह्यात 8482 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन आहे. या संदर्भात आढावा बैठक
जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी 12 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या
सभागृहात घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी यांचेसह अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम
देशपांडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.संजय पांचाळ यांच्यासह विविध
विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाला 16 जानेवारीपासून लसीकरणाची
प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात कोविड-19 लसीकरणासंबंधाने आय.ई.सी.चा योग्य वापर
करावा. सर्वात प्रथम तरुण आरोग्य कर्मऱ्यांनी लस घ्यावी तसेच दुसरा डोज 28 दिवसांनी घ्यावा व एक नवीन आदर्श
ठेवून दुसऱ्याला सुध्दा लस घेण्याबाबत प्रवृत्त करावे. प्रत्येकापर्यंत लस पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय व
निमशासकीय यंत्रणांनी समन्वय साधून कामे करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

blank