33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ वस्तू व सेवाकर कायद्यान्वये व्यापाऱ्यांनी नोंदणी प्रमाणपत्र प्रदर्शित करणे अनिवार्य

वस्तू व सेवाकर कायद्यान्वये व्यापाऱ्यांनी नोंदणी प्रमाणपत्र प्रदर्शित करणे अनिवार्य

0
48

blank

वाशिम, दि. १९ : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा, २०१७ अन्वये नोंदीत व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्याच्या नियम १८ व आपसमेळ योजनेंतर्गत असलेल्या व्यापाऱ्यांनी नियम ५(१) (च) नियम ५ (१) (छ) नुसार आवश्यक बाबींची पूर्तता करावी. तसेच व्यापाऱ्यांनी नियमानुसार शर्तींचे अनुपालन करणे आवश्यक आहे. नियम १८ नुसार व्यवसायाच्या मुख्य ठिकाणी आणि प्रत्येक अतिरिक्त ठिकाणी ठळक जागी नोंदणी प्रमाणपत्र प्रदर्शित करणे बंधनकारक आहे, असे वाशिम वस्तू व सेवाकर कार्यालयाचे सहाय्यक राज्यकर आयुक्त डॉ. पी. बी. राठोड यांनी कळविले आहे.

नामफलकावर वस्तू व सेवाकर ओळखपत्र क्रमांक प्रदर्शित करणे सुद्धा बंधनकारक आहे. नियम ५(१)(च) आपसमेळ योजनेतील व्यापाऱ्यांनी पुरवठा देयकाच्या शीर्ष भागात ‘आपसमेळ करपात्र व्यक्ती पुरवठ्यावर कर गोळा करण्यास पात्र नाही’ असे नमूद करणे अनिवार्य आहे. नियम ५ (१)(छ) आपसमेळ योजनेतील व्यापाऱ्यांनी धंद्याच्या, व्यवसायाच्या मुख्य ठिकाणी किंवा प्रत्येक अतिरिक्त ठिकाणी ठळक जागेवर प्रदर्शित केलेल्या प्रत्येक सूचनेत किंवा नाम फलकावर आपसमेळ करपात्र व्यक्ती असा मजकूर नमूद करणे आवश्यक आहे.

तसेच तरतुदीचे पालन न करणारी नोंदीत व्यक्ती महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा २०१७ कलम १२२ (१) अन्वये दहा हजार रुपये व कलम १२५ अन्वये पंचवीस हजार रुपये इतक्या दंडास पात्र असेल. त्यामुळे शास्तीची अप्रिय कार्यवाही टाळण्यासाठी वस्तू व सेवाकर कायद्यान्वये नोंदीत सर्व व्यक्तींनी नोंदणी प्रमाणपत्र प्रदर्शित करावे, असे डॉ. राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

blank