34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गवळीशिवरा येथे भरदिवसा.दरोडा.

शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गवळीशिवरा येथे भरदिवसा.दरोडा.

0
60

blank

औरंगाबाद.  तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हाद्दीत गवळीशिवरा येथील एका प्रगतीशील शेतकरी रावसाहेब काळवणे या शेतकऱ्यांच्या घरावर दुपारी घरी कुणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात दरोडेखोरानी रोख रक्कम व सोन्या चांदीच्या वस्तुसह अंदाजीत रक्कम चार लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गवळीशिवरा येथे घडली आहे. सदरील कुंटूब हे शेतकरी आहे कुटूंबातील सर्व सदस्य हे शेतात काम करण्यासाठी गेलेले होते. रावसाहेब काळवणे हे लासुर स्टेशन येथे काही कामानिमित्त गेले होते. ते दुपारी घरी परतल्यानंतर दरवाजा उघडून आत जाताच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. सदरील घटना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शेजारील नागरिकांना बोलवुन चोरी झाल्याचे सांगत,आरडाओरड केली.रावसाहेब काळवणे यांनी सदरील घटनेची माहिती शिल्लेगाव पोलीस ठाण्याला देताच शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे.सदर या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरक्षक रविन्द्र खांडेकर यांनी भेट दिली असुन पोलीस स्टेशन शिल्लेगाव येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हाचा तपास पोलीस निरक्षक रविन्द्र खांडेकर हे करीत आहे.

blank