32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी

मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी

0
49

blank

पदवी प्रमाणपत्रावरील  मराठी  (देवनागरी ) नावाचा तपशील तपासणीसाठी उपलब्ध

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा २०२० चा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न होणार आहे.  यासाठी प्रथम सत्र २०२० मध्ये विद्यापीठाने घेतलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी  प्रमाणपत्रावर मराठी (देवनागरी ) नाव अचूक यावे म्हणून मराठी  (देवनागरी ) नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी व पडताळणीसाठी  विद्यार्थ्यांचा तपशील विद्यापीठाच्या www.mu.ac.in  या संकेतस्थळावर दि. २२ जानेवारी २०२१ पासून ते २७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट देऊन आपला मराठी  (देवनागरी ) नावाचा तपशील अचूक आहे का हे पहावे असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे. महाविद्यालय व विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर खालीलप्रमाणे स्वतंत्र लिंक दिलेली आहे.

  1. www.mu.ac.inà Exam & Result àExamination à Convocation Correction (Marathi Name ) (for College) (The College will get the Login ID & Password from the University )
  2.  www.mu.ac.inàExam & Result àExamination à Convocation Correction (Marathi Name ) (for Students)

blank