33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ नारायण मेघाजी लोखंडे श्रमविज्ञान संस्थेचे नूतनीकरण

नारायण मेघाजी लोखंडे श्रमविज्ञान संस्थेचे नूतनीकरण

0
66

blank

अमरावती, दि. 20 : आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱ्या कामगार आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या हिताचे संशोधन श्रमविज्ञान संस्थेने करावे, असे आवाहन राज्याचे कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुंबई येथे केले.

मुंबईच्या परळ भागातील कै.नारायण मेघाजी लोखंडे श्रमविज्ञान संस्थेच्या अद्ययावतीकरणाचा उद्घाटन समारंभ कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते नुकताच झाला, त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कामगार राज्यमंत्री श्री. कडू बोलत होते. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर आदींसह अनेक अधिकारी उपस्थित होते. कामगारमंत्री श्री. वळसे पाटील यांनी यावेळी कामगार चळवळीच्या इतिहासाला उजळा देत संस्थेला शुभेच्छा दिल्या.

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले, शेतकरी आणि कामगार आयुष्यभर कष्ट करतच जगत असतो. त्यामुळे त्यांचे जीवनमान कसे उंचावेल याबाबतचे संशोधन या संस्थेद्वारे व्हावे. कामगार आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी यावेळी विविध योजनांची माहिती दिली. संस्थेच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेतर्फे शासनाचे आभार मानण्यात आले. या संस्थेतील सभागृह, ग्रंथालय व अभ्यासिकेचे नूतनीकरण व अद्ययावतीकरण करण्यात आले आहे.

blank