33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ वडसा रेल्वे स्टेशनवरुन दररोज धावणार जबलपुर चांदा फोर्ट एक्सप्रेस,मात्र रेल्वेला थांबा नाही

वडसा रेल्वे स्टेशनवरुन दररोज धावणार जबलपुर चांदा फोर्ट एक्सप्रेस,मात्र रेल्वेला थांबा नाही

0
266

blank

देसाईगंज दि.21ः- अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या वडसा रेल्वे स्टेशनवरुन जबलपुर- चांदा फोर्ट एक्सप्रेस दररोज धावणार असल्याचा आदेश भारत सरकार च्या रेल्वे मंत्रालयाच्या मंडळाचे उप संचालक विवेक कुमार शर्मा यांनी दि १५ जानेवारी ला आदेश निर्गमित केले आहे.
जबलपुर -चांदा फोर्ट एक्सप्रेस चा मुहुर्त अद्यापही ठरला नसला तरी जबलपुर रेल्वे स्टेशनवरुन सकाळी ५.१५ वाजता प्रस्तान होणार असुन चंद्रपुर येथील चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन वर दुपारा १.५० वाजता आगमन होणार असल्याचे आदेशात नमुद केले आहे. तर चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनवरुन दुपारी २.५० वाजता प्रस्तान होणार असुन रात्री ११.२५ वाजता जबलपुर रेल्वे स्टेशन वर पोहचणार आहे.
जबलपुर चांदा फोर्ट एक्सप्रेस मदन महल, नैनपूर, बालाघाट व गोंदिया या रेल्वे स्टेशन वर थांबणार आहे.तथापी, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा हे एकमात्र रेल्वे स्टेशन असुन देसाईगंज जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व या ठिकाणी अनेक उद्योग असल्याने या ठिकाणी विविध ठिकाणाहुन व्यापारी व उद्योजक यांची फारच वर्दळ असते. त्यामुळे वडसा रेल्वे स्टेशनवर थांबा दिल्यास मोठ्या प्रमाणात वाणीज्यीक व्यवसाय रेल्वे विभागाला मिळु शकते. गोंदिया व चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन च्या अगदी मध्यभागी वडसा रेल्वे स्टेशन असल्याने, वडसा रेल्वे स्टेशन वर थांबा देण्याबाबत वडसा रेल्वे सल्लागार समिती जोरदार मागणी करणार असल्याची माहिती डॉ विष्णु वैरागडे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी कुचकामी

गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या वडसा रेल्वे स्टेशन मार्गे दरभंगा-सिकंदराबाद एक्सप्रेस ,कोरबा-यशवंतपुर एक्सप्रेस, चेन्नई- गया एक्सप्रेस या तीन लांब पल्ल्याच्या गाड्या आठवड्यातुन ये-जा करित आहेत. आता जबलपुर चांदा फोर्ट एक्सप्रेस दररोज धावणार असुन चौथ्या एक्सप्रेस ची भर पडली असली तरी एकही रेल्वे वडसा रेल्वे स्टेशन वर थांबत नसल्याने गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना कवडीचाही फायदा होत नाही हे विशेष.

blank