34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात अखेर मोठी कारवाई सिव्हील सर्जनसह ६ जणांचं...

भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात अखेर मोठी कारवाई सिव्हील सर्जनसह ६ जणांचं निलंबन

0
327

blank

भंडारा : संपूर्ण देश हादरवून सोडणान्या भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता . या दुर्दैवी प्रकारानंतर आता आरोग्य विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे . या दुर्घटनेला जबाबदार ठरवत तिथले डॉक्टर आणि नर्सवर कारवाई करण्यात आली आहे . सिव्हिल सर्जन डॉ . प्रमोद खंडाते , वैद्यकीय अपिकारी अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय . तर डॉ . सुनिता चडे यांची तातडीनं बदली करण्यात आली आहे . तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे . रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा ९ जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला मध्यरात्री आग लागली होती . या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता . त्यात ८ मुली तर २ मुलांचा समावेश होता . या आगीत ३ बालकांचा होरपळून तर ७ बालकांचा पुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला होता . दरम्यान , रुग्णालयातील कर्मचान्यांच्या सतर्कतेमुळे ७ बालकांना वाचवण्यात यश आलं होतं . या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते . त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती . या समितीनं केलेल्या तपासात रुग्णालयातील कर्मचा त्यांच्या हलगजीपणामुळे आग लागल्याचं समोर आलं आहे . ७ जणांवर कारवाई , ६ जणांचं निलंबन आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार , भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेसंबंधीचा अहवाल काल उशिरा आरोग्य विभागाला मिळाला . त्या अहवालानुसार रेडियंट हिटरमध्ये स्पार्क झाल्यानं आग लागली होती . रात्री १ ते १.३० च्या सुमारास ही आग लागली . रुम बंद आणि तिथं प्लास्टिक असल्यानं आग पसरली . २०१५ मध्ये या रुग्णालयाचे उद्घाटन झालं होतं . त्यावेळी रुग्णालयाचं फायर ऑडिट झालं नाही . आगीमागे ते कारणही आहे . तसंच तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि नर्सनी कर्तव्यात कसूर केल्याचं दिसून आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे . या प्रकरणात सिव्हिल सर्जन डॉ . प्रमोद खंडाते , वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय . तर डॉ . सुनिता बडे यांची तातडीनं बदली आली त्याचबरोबर मुशील अबाते यांना बडतर्फ करण्यात आलं आहे . नर्स न्योती भास्कर , स्टाफ नर्स स्मिता आंचीदुलके आणि शुभांगी साठवणे यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे . कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका , कुणावर काय कारवाई डॉ प्रमोद खंडाते . सिव्हिल सर्जन – निलंबित डॉ . सुनीता बडे , अतिरिक्त सिव्हिल सर्जन – बदली अर्चना मेश्राम , वैद्यकीय अधिकारी – निलंबित सुशील अंबडे , बालरोग तज्ञ – सेवा समान न्योती भारस्कार , नर्स तथा- नितंचित स्मिता अधीलडुके , स्टाफ नर्स – सेवा समान गुभांगी साठवणे , स्टाफ नर्स – सेवा समाप्त

blank