37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ मतदारसंघातील विकास कामांना घेऊन आ.चंद्रिकापुरेंची उपमुख्यमंत्री पवारांशी चर्चा

मतदारसंघातील विकास कामांना घेऊन आ.चंद्रिकापुरेंची उपमुख्यमंत्री पवारांशी चर्चा

0
37

blank

अर्जुनी मोरगाव,दि.22ः- अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांना मंजुरी मिळुन निधी उपलब्ध करून देण्यासाठी मतदारसंघाचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांची भेट घेऊन विधानसभा क्षेत्रातील सिंचन,कृषी,व रोजगार या विषयी सविस्तर विषयावर चर्चा केली.
अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्र हा आदिवासी बहुल नक्षलप्रभावीत आहे.या क्षेत्रात अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. या मतदार संघात मजुर वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. मागील मार्च महिन्यापासून कोरोणा विषाणु मुळे लाकडाऊन असल्याने सर्व रोजगार व कामधंदे बंदच होते.मजुराच्या हाताला कामे नसल्याने गोरगरीबांची परिस्थिती दिवंसेदिवस बिकट होत चालली आहे. अशात मजुरवर्गांना रोहयोची कामे मिळावी व या क्षेत्रातील प्रलंबित असलेल्या विकास कामांना मंजुरी मिळुन निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

blank