
गोरेगांव,दि.23ः- गोरेगाव तालुका कांग्रेस कमेटीच्यावतीने रिपब्लीकन टिव्हीचे प्रमुख अर्बन गोस्वामी यांनी केलेल्या बालाकोट हल्ल्यासंदर्भातील व्हाटसप सवांद आणि इतर प्रकरणाला घेऊन शुक्रवारला(दि.22) आंदोलन करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसिलदार मार्फेत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. निवेदन देतेवळी प्रामुख्याने जिला कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष नामदेव कीरसान, तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष डेमेन्द्र राहागंडाले,खरेदी विक्रीचे सभापती झामसींह बघेले,माजी सभापती पी.जी.कटरे,मलेश्याम येरोला,माणिकभाऊ बिसेन,शशी भगत, चंद्रशेखर बोपचे,राहुल कटरे,मदन कोंटागले,विवेक मेंढे,देवचंद कुंभलकर,अशोक शेंडे,खीरचंद येळे,शिव राहागंडाले ,आदेश थुलकर आदी उपस्थित होते.





