38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ मनसे सरचिटणीस गडकरी उद्या गोंदियात

मनसे सरचिटणीस गडकरी उद्या गोंदियात

0
31

blank

गोंदिया,दि.२०-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री. हेमंत गडकरी दिनांक २१ सप्टेंबर २०१५ ला गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. ते कामांचा आढावा हेमंत गडकरी घेणार असून नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात बैठक आणि रणनीती आखण्यासंदर्भात बैठक होणार आहे. तसेच आमगाव – देवरी मार्गावरील मनसे तर्फे साकारण्यात आलेल्या नवनिर्मित प्रवाशी निवाऱ्याचे लोकार्पण हेमंत गडकरी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता आमगाव येथे होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांनी केले आहे.

blank