पुरात वाहून मृत्यू पावलेल्याच्या कुटूबियांना ४ लाखाची मदत

0
14

गोंदिया,दि.२०-जिल्ह्यात दोन दिवसापुर्वी पुजारीटोला धरणाचे दारे उघडण्यात आले होते. त्यामूळे सालेकसा तालुक्यातील कुवाढास नाल्याला पूर आला.हा नाला ओलांडत असताना भूमेश्‍वरी बिलोने व तिच्या दोन जुडवा मुली पुरात वाहून गेल्या.यात भूमेश्वरी आणि मुलगी जयश्री हिचा मृत्यू झाला तर भाग्यश्री बिलोने या अडीच वर्षीय मुलीला नदी काठावर गुरे चारणाऱ्या विजय ढेकवार या तरुणाने पाण्यात उडी मारून वाचविले तर घटनेला २४ तासाचा कालावधी लोटूनही जयश्री बिलोने या अडीच वर्षाच्या चिमुकलीचा अद्याप शोध लागला नाही.दरम्यान मृताच्या नातेवाईकांना जिल्हा आपत्ती निवारणातून 4 लाख रुपयाची मदत देण्यात येणार असल्याची माहिती सालेकसाचे तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी दिली आहे.
सालेकसा तालुक्यातला धानौली हा गांव नक्षल ग्रस्त असून भौगोलिक दृष्ट्या खूपच मागासलेला असल्या मुळे ह्या भागाचा विकास होऊ शकला नाही. मुलभूत सुख सोयी सुधा ह्या भागात आज हि कोसो दूर आहेत. बिंझली, खोलगढ, गरुटोला, चिचटोला सह इतर गावातील लोक बिंझली गावा जवळ असलेल्या कुवाढास ह्या नाल्याला ओलांडून ये जा करतात याच गावतील भूमेश्‍वरी बिलोने हि महिला दोन दिवसा आधी आपल्या माहेरी गेली होती. परत आपल्या बिंझली गावी परत येण्या करिता निघाली होती मात्र मागील दोन दिवसापुर्वी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ह्या नाल्याला पूर आला होता. याच नाल्याला ओलांडणाचा प्रयत्न करणाऱ्या भूमेश्वरी बाबूलाल बिलोने हिचा पाण्यात तोल सुटला आणि ती नाल्याचा पुरात वाहू गेली. पण अडीच वर्षाची भाग्यश्री ह्या मुलीचा भाग्य बलवत्तर असल्याने तीला वाचवण्यात आल्.भूमेश्वरी आणि तिची दुसरी मुलगी जयश्रीला पाण्यात जलसमाधी मिळाली आहे.
या भागात राहणाऱ्या लोकांनी येथील लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांना या नाल्यात पूल बांधण्या करिता अनेकदा निवेदन दिले मात्र अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या उदाशीन धोरणामुळे आज भूमेशवरी बिलोने आणि जयश्री बिलोने हिला यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र आजूनही कुठल्याही लोकप्रतिनिधीने बिलोने कुटूबियांची साधी भेट सुधा घेतली नाही. सालेकसा तालुक्याचे तहसिलदार प्रशांत सागडे यांनी घटना स्थळी जावून बिलोने कुटूबियांची भेट घेत अंत्य विधी करण्या करिता ५ हजार रुपयांची मदत केली असून जिल्हा आपत्ती निधीतून मृतकाच्या नातेवाईकांना ४ लाख रुपायचा धनादेश आणि भाग्यश्री बिलोने या मुलीला वाचविणार्या विजय ढेकवार या तरुणाला सोर्य पुरस्कार मिळवून देण्याचे आश्वासन तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी दिले.