33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home क्रीडा क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी

क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी

0
31

वाशिम, दि. २४ (जिमाका) : राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी संबंधित संस्था, संघटना यांना १८ जानेवारी २०२१ पासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेर (कंटेनमेंट झोनबाहेर) स्पर्धा आयोजित करण्यास जिल्ह्यात परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत.

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील खुल्या जागेत राज्य शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘एसओपी’नुसार सर्व स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षणासाठी संबंधित संस्था, संघटना १८ जानेवारीपासून सुरु करता येतील. खेळाच्या स्पर्धेचे व खेळासंबंधी इतर बाबींच्या संस्थांना, संघटनांना कोविड-१९ संबंधी अटी, शर्तींचे पालन करून स्पर्धा आयोजित करता येतील. यापूर्वी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशातील अटी व शर्ती कायम राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी १५ जानेवारी रोजी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

blank