37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ खातीटोला येथे १५ लक्ष रुपये किमतीचे ग्रा.प.इमारतीचे लोकार्पण

खातीटोला येथे १५ लक्ष रुपये किमतीचे ग्रा.प.इमारतीचे लोकार्पण

0
41

blank

तिरोडा – आपल्याला काम करण्याची धुंदी असली पाहिजे, आत्मसंतोषासाठी कार्य करता आले पाहिजे. भक्त पुंडलिकाने आईबापाची सेवा एकनिष्ठेने केली. त्यावेळी देव वैकुंठातून त्याचेकडे आले नि म्हणाले, पुंडलिका, मी प्रसन्न झालो आहे, माझे दर्शन घे. पुंडलिकाने म्हटले – देवा! ज्या आईबापाच्या सेवेमुळे तुम्हाला येथे यावे लागले ती सेवा तुम्हा देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, ती मी कशी सोडू अखेर आपली सेवा चालू ठेवूनच त्याने वीट फेकली आणि तिचेवर विठ्ठलाला तिष्ठत उभे राहणे भाग पाडले. कित्येक वेळा आपण गावाच्या सुधारणेकडे दुर्लक्ष करतो, सार्वजनिक कामांकडे कानाडोळा करतो, व त्यामुळे गावाच विकास थांबतो तेव्हा सर्व नागरिकांनी गावाच्या विकासाकरिता समोर येवून प्रशासनास सहकार्य करण्याचे प्रतिपादन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी जनतेस केले खातीटोला येथे जिल्हा वार्षिक योजना २०१९-२० अंतर्गत खातीटोला येथे १५.०० लक्ष रुपये ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजप, माजी जी.प.सदस्या सौ. छायाताई दसरे, माजी उपसभापती डॉ.वसंत भगत, माजी प.स.सदस्य प्रकाश पटले,पवन पटले,अर्जुन नागपुरे झालूटोला सरपंच शंकर टेंभरे,उपसरपंच रेखाताई मेश्राम, सुभाष साठवणे, ग्रा.प.सदस्य गेंदलाल चौधरी, राजेशकुमार ठाकरे, भुमेस्व भोयर, सौ. धनवनताताई नेवारे सदस्या, सौ. पुष्पाताई कटरे सदस्या, शमकलाताई चौधरी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव विवेक विवेक चौधरी,आत्माराम दसरे, प्यारेलालजी चौधरी त.मु.स. झालुटोला/खतीटोला, सौ. लालिताताई नरेंद्र ठाकरे पो. पा. झालुटोला, कु. एस. टी.बीसेन ग्रामेविका, नरेंद्र ठाकरे ग्राम रोजगार सेवक , सुरेश चौरीवार परिचर, छत्रपती शहारे विद्युत वाहक, माधुरी बारेवार संगणक परिचालक, भुमेश ठाकरे स्वचक ग्राम पंचायत झालुटोला उपस्थित होते

blank