
गोंदिया : महावितरण कंपनीत मागील 10 ते 15 वर्षांपासून कार्यरत कंत्राटी कर्मचार्यांना काढून 35 ते 40 हजार रुपये घेऊन नोकरी दिली जात आहे. या प्रकरणाला घेऊन कार्यरत कर्मचार्यांनी आता 26 जानेवारीला अर्धनग्न मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
कंत्राटी कर्मचार्यांद्वारे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन कंत्राटी सेलच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयासमोर 19 जानेवारीपासून उपोषण केले जात आहे. फेडरेशनचे म्हणणे आहे की, मागील 10 ते 15 वर्षांपासून कार्यरत कर्मचार्यांना नवीन कंत्राटदाराने कमावरून काढले आहे. 35 ते 40 हजार रुपये घेऊन नवीन कर्मचार्यांची भर्ती केली जात आहे. जुन्या कर्मचार्यांना कामावर ठेवण्यासाठी पैशाची मागणी केली जात आहे. कर्मचार्यांवर पैशासह कोर्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी देण्यासाठी दबाव घातला जात आहे. कंत्राटदाराद्वारे नियुक्त केलेल्या लोकांना अधिवेशनात गेल्यास कमावरून काढण्याची धमकी दिली जात आहे. भंडारा येथील उर्मिला इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग कंपनी व कंपनीचे सुपरवायजर अतिरेक करीत आहेत.





