
वाशिम, दि. २५ : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार आज, २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उप जिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली.
यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखा अधिकारी युसुफ शेख, नायब तहसीलदार सुनील देशमुख, घनश्याम डाहोरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





