32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ महिलांनी गावाच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा : माजी आमदार राजेंद्र जैन

महिलांनी गावाच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा : माजी आमदार राजेंद्र जैन

0
35

blank

गोंदिया : देश व राज्यावर कोरोनाची आपत्ती ओढावली होती. या आपत्तीच्या काळातही महिलांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच आपण कोरोनाच्या लढ्यात यशस्वी ठरलो आहे. त्याच प्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये ५० टक्के आरक्षणाच्या व्यतिरिक्तही अनेक महिला निवडूण आल्या आहेत. महिलांनी प्रगतीची कास धरून गाव विकासात पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सरांडी येथे आयोजित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व कोरोना योद्धाचा सत्कार समारोह तथा महिला मेळाव्यात केले. माजी आमदार राजेंद्र जैन हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. राजलक्ष्मीताई तुरकर, युवा नेते रविकांत बोपचे, राकाँ. दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज डोंगरे, राकाँचे तिरोडा तालुका अध्यक्ष प्रेमभाऊ रहांगडाले,आदी उपस्थित होते. या मेळाव्याला हजारोच्या संख्येत महिला सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे कोरोना काळात उत्कृष्ठ सेवा पुरविणार्‍या महिला योद्धांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने सर्वश्री राजेंद्र जैन, सौ. राजलक्ष्मीताई तुरकर,प्रेमभाऊ रहांगडाले,रविकांत बोपचे,मनोज डोंगरे,प्रेमसागर धावडे,सौ. जया धावडे, माणिक वाणी,नत्थू गजभिये,रामकृष्ण् लांजेवार, शिशुपाल पटले, डा. संगिता भोयर, सरिता पटले, हुबेकर मॅडम,मीनाक्षी डोंगरे,कीशोर कुंभरे, राजेश टेकाम, अभयजी पाटील, कल्पना मलेवार, संतोष लिल्हारे, दिगंबर पाटील, ऊर्मिला धावडे, अरुण कडव,दिपमाला टेंभेकर, आदी परिसरातील नागरिकांन बहुसंख्येने उपस्थित होते.

blank