
सालेकसा,दि.28ः- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हाजराफॉल पर्यटन स्थळ येथे निशुल्क रोग निदान शिबिराचे आयोजन सालेकसाचे वनपरिक्षेत्राधिकारी अभिजित ईलमकर व संयुक्त वनव्यवस्थापन समिती नवाटोलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी हजारोच्या संख्येने पर्यटक हाजरा फॉलला भेट देत असतात. त्यानुषंगाने पर्यटकांना, वन कर्मचाऱ्यांना तसेच स्थानिक ग्रामस्थांना रोगनिदान शिबिराचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल म्हणून या दिवशी रोगनिदान शिबिर ठेवण्यात आले.
गोंदिया शहरातील वेगवेगळ्या शाखांतील तज्ञ डॉक्टरांनी रोगनिदान शिबिराला उपस्थित राहून आदिवासीबहुल नक्षलग्रस्त भागात आपले सेवा पुरविली. यामध्ये डॉ प्रमेश गायधने हृदय रोग तज्ञ, डॉ लोकेश चीरवतकर मानसोपचार तज्ञ, डॉ संजय माहुले पथोलॉजीस्ट , डॉ स्वेतल माहुले स्त्री रोग तज्ञ, डॉ राकेश चिखलोंडे बाल रोग तज्ञ, डॉ दिगंबर मरस्कोल्हे हड्डी रोग तज्ञ, डॉ नितिका पोयाम नेत्ररोग तज्ञ , डॉ सनी जयस्वाल ब्रेन व स्पाइन सर्जन, डॉ सचिन केलनका शल्यचिकित्सक, डॉ शंकर बनोटे दंतरोग तज्ञ, डॉक्टर हेमंत कुमार गौतम आयुर्वेदाचार्य, डॉ अजय बेलानी होमिओपॅथिक विशेषज्ञ तसेच नॅशनल मेडिकल मोबाईल युनिट सालेकसा यांचा समावेश आहे.
सदर रोग निदान शिबिराचा पर्यटकांनी, वन कर्मचाऱ्यांनी तसेच 142 स्थानिक ग्रामस्थांनी लाभ घेतला.कार्यक्रमाला उपस्थित राहून कुलराज सिंग उपवनसंरक्षक गोंदिया,प्रदीप पाटील सहाय्यक वनसंरक्षक गोंदिया तसेच डॉक्टर राजेंद्र जैन शल्यचिकित्सक गोंदिया यांनी मार्गदर्शन केले.आदिवासीबहुल दुर्गम क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल उपरोक्त डॉक्टरांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. हिरवळ बहुउद्देशीय संस्था संस्थेचे रुपेश निंबरते, त्र्यंबक जरोदे यांनी कार्यक्रमला सहयोग दिला.





