33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्हा परिषदेवर ग्राम पंचायत कर्मचा-यांचे धरणे आंदोलन

गोंदिया जिल्हा परिषदेवर ग्राम पंचायत कर्मचा-यांचे धरणे आंदोलन

0
134

blank

गोंदिया,दि.28ः महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ आयटक गोंदिया जिल्हा तर्फे राज्यव्यापी आंदोलनांतग॔त आज २८ जानेवारीला गोंदिया जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्यात आले व मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करून चर्चा करण्यात आली. मिलिंद गनविर (राज्य संघटन सचिव),शत्रुघन लांजेवार (जिल्हा अध्यक्ष),सुखदेव शहारे (कार्याध्यक्ष),महेंद्र भोयर (कोषाध्यक्ष),विष्णू हत्तीमारे (संघटन सचिव),रविंद्र किटे (सचिव),आशिष उरकुड़े (उपाध्यक्ष),खोजराम दरवड़े (सहसचिव),ईश्वरदास भंडारी (उपाध्यक्ष),बुधराम बोपचे (सहसचिव),दिप्ती राणे,सुनंदा दहिकर,मंगला बिसेन यांनी राज्याचे ग्राम विकास मंत्री यांच्या नावे सादर केलेल्या निवेदनात किमान वेतन मिळण्यास अड़थळे निर्माण करणारा वसुलीची आणि उत्पन्नाची अट असलेला दि.२८एप्रिल २०२० चा शासन निर्णय रद्द करणे,यावलकर समितीच्या सिफारसी मान्य करून ग्राम पंचायत करमचा-यांना वेतन श्रेणी लागु करणे,किमान वेतन व राहणीमान भत्यासाठी १०० टक्के अनुदान राज्य शासनाने द्यावे, पेंशन योजना लागु करणे, १०टक्के आरक्षणांतग॔त भरती करणे,कालबाह्य ठरणारा जाचक लोकसंख्येचा आकृतीबंध रद्द करणे सह स्थानिक स्तराच्या मागण्यां मध्ये १०आगस्ट २०२० पासून सुधारीत किमान वेतन दर लागु करण्यात यावा,सेवा शर्तीची अमलबजावणी न करणा-या अधिकां-यावर कारवाई करणे,१०टक्के आरक्षणांतग॔त भरती करणे,तक्रार निवारण समिती ची बैठक घेवुण करमचा-यांच्या अडचणी सोड़वणे ई.मागण्यांसाठी फेब्रुवारी महिन्यात समितीची बैठक घेण्याचे आश्वासन सिईओ यांनी दिले. धरणे आंदोलन यशस्वी करण्यात विनोद शहारे,सुनिल लिल्हारे,मुरलीधर पटले,प्रयाग नंदरधने,मुकेश कापगते,खुशाल बणकर,निलेश मस्के ई.कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

blank