34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आधुनिक बी-बियाणे पेरणी यंत्राचे विमोचन

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आधुनिक बी-बियाणे पेरणी यंत्राचे विमोचन

0
36

blank

वाशिम, दि. २९  : रिसोड येथील एस. पी. ऍग्रो इंडस्ट्रीजमध्ये कृषी विभागाच्या मार्गदर्शनात विकसित केलेल्या सुरज बीबीएफ प्लांटर अर्थात आधुनिक बी-बियाणे पेरणी यंत्राचे विमोचन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी रिसोड येथील मालेगाव रोडवरील इंडस्ट्रीजमध्ये करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ऍड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, आमदार डॉ. संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व एस. पी. ऍग्रो इंडस्ट्रीजचे संचालक शहादत खा पठाण प्रामुख्याने उपस्थित होते.

सुरज बीबीएफ प्लांटरमधून हळद, आलू, अद्रक आणि नवीन तंत्रज्ञानापासून विकसित केलेल्या विविध पेरणी यंत्रातून तूर यासह अन्य बियाण्याची पेरणी करता येणार आहे. या पेरणी यंत्रामुळे बियाण्याची २५ टक्के बचत होणार आहे. बचतीमुळे जास्त उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बियाण्यांवरील होणारा खर्च वाचणार आहे.

आधुनिक बी-बियाणे पेरणी यंत्राच्या विमोचन प्रसंगी पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, रिसोडसारख्या छोट्या शहरात या तंत्रज्ञानाचा शोध लावल्याबद्दल शहादतखाँ पठाण कौतुकास पात्र आहे. शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त अशा आधुनिक यंत्रांची निर्मिती केली आहे. नक्की त्याचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्यांना होईल. बाजारात जेव्हा हे यंत्र येईल आणि शेतकरी त्याचा अनुभव घेतील, तेव्हा त्यांची बियाण्यांवरील पैसे वाचलेले असतील. शास्त्रशुद्ध पद्धतीने बियाण्यांची पेरणी होण्यास या तंत्राचा उपयोग होणार आहे. कमी खर्चात चांगले उत्पादन शेतकऱ्यांना होणार असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

 प्रारंभी एस. पी. ऍग्रो इंडस्ट्रीजमध्ये पालकमंत्री यांचे आगमन होताच त्यांनी सुरज बीबीएफ प्लांटरचे विमोचन केले. संस्थेचे संचालक शहादतखा पठाण आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्याकडून या आधुनिक यंत्रांबाबत पालकमंत्री व अन्य मान्यवरांनी माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार इरफान पठाण यांनी मानले.

*****

blank