
गोंदिया,दि.30: –गोंदिया रेस्टॉरेंट असोसिएशन आणि अन्न व सुरक्षा विभागाच्या वतीने गोंदियाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकत्र येत हाँटेल व रेस्टारेंट संचालकासोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.चर्चासत्राच्या माध्यमातून अन्न व सुरक्षा विभाग आणि रेस्टॉरेंटच्या मालकांमधील ही चर्चा भविष्यात ग्राहकांना उत्कृष्ठ जेवण व अन्नपदार्थ पुरविण्यासाठी उपयुक्त ठरणार असून ही सुरुवात पहिले पाऊल असल्याचे मत भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती शितल देशपांडे यांनी हॉटेल पॅसिफिक येथे आयोजित चर्चासत्रामध्ये व्यक्त केले. श्रीमती देशपांडे यांनी प्रोजेक्टर मार्फत रेस्टॉरेंट व हॉटेलांमध्ये काय आवश्यक आहे आणि कोणत्या खबरदारी घ्याव्यात, याचा असोसिएशनच्या सर्व सदस्यांना काय फायदा होईल, या विषयावर मार्गदर्शन केले.या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी गोंदिया रेस्टॉरेंट असोसिएशनचे अध्यक्ष अखिलेश सेठ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अन्न सुरक्षा अधिकारी बी.जी. नंदनवार,पी.व्ही. मानवटकर उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे स्वागत राजेश चवडा, गिरीश शिवहरे, राजन शिवहरे, सिमरन होरा, मनीष अग्रवाल यांनी केले.संचालन सचिव राजेश अग्रवाल यानी केले तर आभार कोषाध्यक्ष लक्की भाटिया यांनी मानले.चर्चासत्राला असोसिएशनचे सदस्य बंटी चौधरी, राहुल वंजारी,अम्रत चौरसिया, के चतवानी, जपजीत सिंग भाटिया,अंकित पटेल, गुलशन यादव, विकास बिसेन, फारुख सौलंकी,रविन्द्र जैन, तुषार चौरसिया, नीरज अग्रवाल, मनीष अग्रवाल, घनश्याम जाडेजा,नीरज रँगलानी,नाशिर सोलंकी, संजय लारोकर, संजय शर्मा, ललित शर्मा आदि उपस्थित होते.





