
गोंदिया,दि.30ः-गोंदिया जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज(दि.30) महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी चौकातील प्रतिमेला माल्यार्पण करुन हुतात्मा दिन साजरा करण्यांत आला.काँग्रेस कमिटीव्दारे कॉंग्रेस कार्यालय भोला भवन येथे राष्ट्रपीता महात्मा गांधीच्या फोटोला माल्यार्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.याप्रंसगी जिल्हाध्यक्ष डॉ.एन.डी.किरसान यांनी गांधीजीच्या ” सत्य व अंहिसावादी” विचारांवर प्रकाश टाकला. आज गांधीजीने दाखविलेल्या मार्गावर जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले. त्याचप्रमाणे प्रदेश सचिव विनोद जैन व अमर वराडे यांनी गांधीजीनी देशाला दिलेल्या ” योग्यदानाबददल व स्वातंत्र सग्राम ” मधील सहभागाबददल माहिती दिली. याप्रंसगी शहर अध्यक्ष जहीरभाई अहमद,तालुका अध्यक्ष सुर्यप्रकाश भगत यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष अनिल गौतम,महासचिव एङ.योगेश अग्रवाल बापू,जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस जितेश राणे, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष आलोक मोहंती,गोपालराव कापसे,उपाध्यक्ष रामेश्वर लिल्हारे,बलजितसिंग बग्गा,अमर राहूल,शैलेश जायस्वाल,नफीस सिध्दीकी,दिपक उके,राजकुमार पाऊलझगडे,दिलीप गौतम,नरेशकुमार लिल्हारे,बाबुराव मेश्राम,आदिलभाई पठाण,पवन नागवे,विजेन्द्र बोरांडे,नईमभाई खान,राजेन्द्र डहाट, दिनेश तरोणे उपस्थित होते .





